
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ (आधी पैसे भरून मिळणारे मीटर) बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. सामान्य घरगुती ग्राहकांना आधी पैसे भरून मिळणारे मीटर लावले जाणार नाहीत, या मीटरमुळे वीज देयकात १० टक्के सवलत मिळणार आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात सांगितले. सदस्य भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रारंभी प्रत्येक ग्राहकाला ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ लावण्याचा प्रस्ताव होता; मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने राज्यशासनाने टप्प्याटप्प्याने कार्यवाहीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ‘फिडर मीटर’ आणि डिस्ट्रीब्युशन मीटर बसवण्यात आले असून सध्या शासकीय कार्यालये आणि आस्थापनांमध्येच ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ बसवण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी मात्र ‘पोस्टपेड स्मार्ट मीटर’च बसवले जात आहेत.
‘स्मार्ट मीटर’मुळे ग्राहकांना भ्रमणभाष ‘ॲप’च्या माध्यमातून तासागणिक वीज वापराचा तपशील मिळतो, त्यामुळे वापराची पडताळणी करणे सोपे झाले आहे. याशिवाय २४ घंटे तक्रारनिवारण व्यवस्था उपलब्ध आहे. आतापर्यंत ५ वेगवेगळ्या आस्थापनांनी बसवलेल्या ‘स्मार्ट मीटर’मध्ये केवळ एक टक्क्यांहून अल्प त्रुटी आढळल्या आहेत. पुढील ५ वर्षे ‘स्मार्ट मीटर पोस्टपेड’ स्वरूपातच रहाणार असून प्रीपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नाही.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !