महाराष्ट्रात २ सहस्र बिबट्यांचा वावर !

श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी.
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात बिबट्यांच्या आक्रमणांमुळे भीतीचे वातावरण आहे. आक्रमणाच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनखात्याने बिबट्यांना जेरबंद करून ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रयत्न केले; परंतु गुजरातमधील ‘वनतारा प्राणी संरक्षण केंद्रा’ने महाराष्ट्रातील ५० हून अधिक बिबट्यांना सामावून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सध्या २ सहस्र बिबट्यांचा वावर आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. १३ डिसेंबर या दिवशी सुयोग या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारतांना अजित पवार म्हणाले की, राज्यात बिबट्यांची संख्या २ सहस्रांहून अधिक असण्याची शक्यता आहे. ऊसशेतीच्या भागांत बिबटे मोठ्या प्रमाणात वावर करतात आणि प्रजनन करतात. ‘वनतारा केंद्रा’मध्ये सर्व बिबटे स्थलांतरित करणे शक्य नसल्याने इतर पर्याय शोधावे लागतील. बिबट्यांची नसबंदी हा एक पर्याय असला, तरी त्याचे परिणाम दिसण्यास अनेक वर्षे लागतील, असे त्यांनी नमूद केले.
बिबट्यांसाठी शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव हास्यास्पद !
बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनमंत्र्यांनी अरण्यात शेळ्या-मेंढ्या सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता; मात्र अजित पवार यांनी हा हास्यास्पद निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. बिबट्यांआधी ग्रामीण भागातील लोकच या शेळ्या-मेंढ्यांची शिकार करतील. नसबंदी केली, तरी बिबट्यांची नवी पैदास थांबेल; पण सध्या मानवावर आक्रमण करणार्या बिबट्यांचा बंदोबस्त नसबंदी करून होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !