
सांगली – राज्यातील मंदिरे, देवस्थान तसेच धार्मिक आणि धर्मदाय संस्था या कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक, धार्मिक अन् जनसेवा करतात. अनेक श्रद्धाळू भक्त स्वतःच्या श्रद्धेच्या भावनेतून व सेवाभावातून मंदिरांना भूमी दानरूपाने प्रदान करतात, तसेच मंदिरांना आवश्यक गरजांसाठी समाजहिताच्या उद्देशाने भूमी खरेदी करावी लागते. या हस्तांतरणामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसतांना या हस्तांतरणात पूर्ण मुंद्रांक शुल्क आकारले जाते. तरी मंदिरांचे मुद्रांक शुल्क यांसह कोणत्याही प्रकारचे शुल्क-कर पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन सांगली जिल्ह्यात आटपाडी आणि विटा येथे देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी काही हस्तांतरण प्रकरणात अटी शर्तीवर मुद्रांक शुल्कात अंशतः सूट देण्यात आलेली आहे; परंतु ती अत्यल्प आणि नाममात्र आहे. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० या संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.
१. आटपाडी येथे हे निवेदन निवासी नायब तहसीलदार डी.एस्. पुकळे यांनी स्वीकारले. या प्रसंगी खरसुंडी देवस्थानचे मंदिर विश्वस्त श्री. भरत पाटील, सातभाई विठ्ठल मंदिराचे विष्णु गायकवाड, साईबाबा मंदिराचे श्री. दत्तात्रय पवार, श्री मायाक्का मंदिर ट्रस्टचे श्री. बबलू गुरव, श्री तुळजापूर भवानी मंदिराचे श्री. बाबूराव गुरव, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे नी. दीपक पोळ, श्री कल्लेश्वर मंदिर देवस्थानचे श्री. सुरेश कानडे, श्री अंबाबाई मंदिराचे श्री. जीवन पोळ, राममंदिराचे श्री. शिरीष पाठक, सोमेश्वर मंदिराचे श्री. बजरंग फडतरे, श्री चौडेश्वरी मंदिराचे स्नेहजीत पोतदार, श्री विठ्ठल नाथ मंदिराचे श्री. शहाजी गायकवाड, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. संजय घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.

२. विटा येथे नायब तहसीलदार हजारे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी हनुमान मंदिराचे डॉ. अवधूत बापट, बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित श्रीराम मंदिराचे श्री. महेश देशपांडे, विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. सुनील खलिपे, श्री. जालिंदर चोथे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. राहुल कदम, सिंह सेनेचे संस्थापक श्री. शिव शिंदे, महिला आघाडीप्रमुख पुष्पाताई बोबडे, सनातन संस्थेच्या सौ. जयश्री वेदपाठक, सौ. अलका रोकडे, सौ. सुरेखा सुतार उपस्थित होत्या.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा