हिंदु जनजागृती समितीच्या मागणीनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हाधिकार्यांना तत्परतेने आदेश !

नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र तुळजापूर मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग झाल्याच्या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर गुन्हा नोंद करावा, तसेच श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंदिराच्या रचनेत कोणतेही पालट न करता आराखड्यात कुलाचार, वंशपरंपरा आणि अन्य धार्मिक कृती यांसाठी जागा ठेवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांना १० डिसेंबर या दिवशी विधानभवनात देण्यात आले. श्री. प्रताप सरनाईक यांनी त्याच वेळी तत्परतेने धाराशिव येथील जिल्हाधिकार्यांना दूरभाष करून या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित त्यांना सादर करावा, असा आदेश त्यांना दिला. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अतुल अर्वेन्ला, अभिजीत पोलके उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम चालू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील अनेक उपदेवतांच्या मूर्ती हालवण्यात आल्या आहेत. मंदिराची रचना पालटण्याची कामे चालू करतांना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन श्री ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याविषयी अनेक स्थानिक संघटना, नागरिक यांनी तक्रारी करूनही गेली अडीच महिने दोषी शासकीय अधिकार्यांवर अद्याप गुन्हे का नोंदवले नाहीत ? या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, तसेच आराखड्याच्या धार्मिक दृष्टीकोनातून आढावा घेण्यासाठी धर्मशास्त्राचे अभ्यासक, धर्माचार्य आणि शंकराचार्य पीठांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. मुख्य प्रवेशद्वारे पूर्वीप्रमाणेच ठेवावे. मागून नवीन द्वार सिद्ध करून मंदिराची रचना पालटू नये, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव