हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तातडीने संमत करा !

पारगाव (दौंड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनातून शासनाकडे मागणी !

या आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक नागरिक, युवक 

पारगाव (दौंड), ८ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ सारख्या हिंदु युवतींचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या षड्यंत्राला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आगामी हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तातडीने संमत करावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पारगाव (सालू मालू) येथे ७ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.

या वेळी सरकारने या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस कायदेशीर पावले उचलण्याची आवश्यकता आंदोलकांनी अधोरेखित केली, तसेच फलक आणि घोषवाक्य यांद्वारे समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.(अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून कृती करणे आवश्यक ! – संपादक)

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रमुख मागण्या

१. लव्ह जिहाद करणार्‍या गुन्हेगारांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा करावी.

२. उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांप्रमाणे राज्यात त्वरित धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा.

३. लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे मदरसे, मौलवी आणि अन्य धार्मिक संघटना यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.

४. महाराष्ट्र शासनाने लव्ह जिहादविरोधात जनजागृतीसाठी ‘मै हूं दुर्गा, रणरागिणी’ या सारखे उपक्रम तातडीने राबवावेत.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. अतुल ताकवणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रामकृष्ण ताकवणे, माजी उपसरपंच श्री. बाजीराव तांबे, उद्योजक श्री. सागर ताकवणे आणि केडगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात स्थानिक नागरिक, महिला आणि युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.