
कर्णावती – एका ‘रॅपिडो ड्रायव्हर’च्या (रिक्क्षा चालकाच्या) बँक खात्यातून ३३१ कोटी रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार झाला असून त्याचा थेट संबंध गुजरात युवक काँग्रेसचे नेते आदित्य जुला यांच्याशी असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) चौकशीतून पुढे आली आहे. जुला यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये ताज रिसॉर्टला लग्नासाठी कंत्राट देण्यासाठी बनावट स्वाक्षर्यांचा वापर केला. तसेच व्यवहार करण्यासाठी १७ वेगवेगळे ‘पॅनकार्ड’ क्रमांकही प्रदान केले होते. रिक्क्षा चालकाच्या बँक खात्याचा वापर बेकायदेशीर व्यहारांसाठी झाला आणि त्याचा संबंध जुला यांच्याशी आहे, असे समोर आले आहे.
🚨 Another Congress Scam Erupts in Gujarat
After Congress leader Arshman Khan Baloch’s cyber-fraud arrest, now a ₹331 crore scam has surfaced linked to Youth Congress leader Aditya Jula.
Jula used 17 fake PAN numbers, forged signatures, and operated a money-laundering chain… https://t.co/Kx2Bnl0jZK pic.twitter.com/QILQg8014a
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 3, 2025
१. ‘ईडी’ने उघड केले की, रॅपिडो ड्रायव्हरच्या खात्याद्वारे कोट्यवधी रुपये वळवले गेले आणि ही रक्कम त्वरित हस्तांतरित करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२४ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत त्याच्या बँक खात्यात ३३१ कोटी रुपये जमा करण्यात आले.
२. ‘ईडी’च्या अधिकार्यांनी सांगितले की, ड्रायव्हरच्या बँक खात्याचा त्याला कल्पना न देता वापर करण्यात आला. अज्ञात स्रोतांकडून मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी हे खाते वापरले गेले.
३. या स्रोताचा संबंध एका आर्थिक साखळीशी असल्याचे उघड झाले आहे. ‘ईडी’च्या तपासत ‘बेटिंग ॲप’शी संबंधित एक मोठी ‘मनी लाँडरिंग’ (काळा पैसा पांढरा करण्याची प्रक्रिया) यंत्रणा समोर आले असून त्यात काँग्रेस नेत्याचा संबंध आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, राष्ट्रघातकी आदी लोकांचा भरणा असलेला पक्ष असून तो लोकशाहीला कलंक आहे. अशा पक्षावर बंदी घालणे आवश्यक ! |
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !