
सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने तिथीनुसार ‘शिवप्रतापदिन’ हा अफझलखान वधाचा दिवस म्हणजे ‘आतंकवादविरोधी दिन’ म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ध्येयमंत्र अन् प्रेरणामंत्र म्हणून फटाक्यांची आतिषबाजी करून ‘शिवप्रतापदिना’चा जल्लोष करून जिलेबीचे वाटप करण्यात आले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, कार्यकर्ते सर्वश्री दत्ता भोकरे, मनोज साळुंखे, मिरज शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, सर्वश्री प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवने आदी उपस्थित होते.
अफझलखानाच्या थडग्याप्रमाणे औरंगजेबाचे थडगे बुलडोझर लावून उखडून टाकू ! – नितीन शिंदे, माजी आमदार
वंचित बहुजन आघाडीचे नेते जाहीर सभेत सांगतात की, व्यासपिठावर क्रूरकर्मा औरंगजेब, क्रूरकर्मा टिपू सुलतान यांची प्रतिमा लावणार आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ, चादर चढवणार आहे. अशा वेळी सरकारने आम्हाला अडवून दाखवावे, असे आव्हान ते देतात. ते जर असे आव्हान देत असतील, तर अफझलखानाच्या थडग्याभोवती असलेले अतिक्रमण बुलडोझर लावून जसे पाडले, तसे औरंगजेबाचे थडगे आंदोलन करून उखडून फेकून देऊ. कुणाच्यात दम असेल, तर अडवून दाखवा, अशी चेतावणी श्री. नितीन शिंदे यांनी दिली.
औरंगजेब, टिपू सुलतान, अफझलखान यांचा ‘उदो उदो’ करणार्यांना वैध मार्गाने जागा दाखवून द्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की, आज राज्यामध्ये जे लोक देशाचा शत्रू क्रूरकर्मा औरंगजेब, टिपू सुलतान, अफझलखान यांचा ‘उदो उदो’ करत आहेत, त्यांना वैध मार्गाने जागा दाखवून द्या. देशावर आक्रमण करण्यासाठी जे कुणी देशावर चालून आले असतील, तर ते देशाचे शत्रू आहेत. जे कुणी मुसलमानांचा ‘उदो उदो’ करत असतील, त्यांच्यावर कारवाई करावी.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !