दोनापावला आणि म्हापसा येथील दरोड्याच्या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून माहिती उघड

पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात सशस्त्र दरोडे घालण्यामध्ये बांगलादेशी टोळीचा सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली आहे. गोव्यात मागील ६ मासांत दोनापावाला, गणेशपुरी-म्हापसा आणि शेवटी बायणा-वास्को येथे एकूण ३ सशस्त्र दरोडे पडले आहेत. यामधील दोनापावला आणि गणेशपुरी-म्हापसा येथील दरोड्यासंबंधी सीसीटीव्ही चित्रीकरणामधून एकाच बांगलादेशी टोळीने हे दोन्ही दरोडे घातल्याचे उघडकीस आले आहे.
या बांगलादेशी टोळीने चालू वर्षी एप्रिल मासात प्रथम दोनापावला येथे धेंपो कुटुंबियांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घातला आणि ते बांगलादेशामध्ये पसार झाले. ही टोळी पुन्हा गोव्यात आली आणि त्यांनी गणेशपुरी, म्हापसा येथे दरोडा घातला. गणेशपुरी, म्हापसा येथे दरोडा घालून ही टोळी पुन्हा बांगलादेशात पसार झाली. अन्वेषण यंत्रणांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भारत-बांगलादेश सीमेवर काही दलाल कार्यरत असून ते अशा गुन्हेगारांना दोन्ही देशांमध्ये ये-जा करण्यास साहाय्य करत आहेत. हे दलाल पैसे घेऊन गुन्हेगारांना भारतात गैरमागार्न प्रवेश करण्याच्या वाटा दाखवत असतात.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण