अटकेनंतर रिक्शाचालकाने कान पकडून मागितली क्षमा

ठाणे – येथे परप्रांतीय रिक्शाचालकाने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अभद्र भाषा वापरून एका मराठी तरुणाला शिवीगाळ केली होती. दारूच्या नशेत असलेल्या या रिक्शाचालकाच्या घटनेचे चित्रण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते.
या प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी चितळसर, मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शैलेंद्र यादव याला अटक केली आहे, तर त्याचा एक साथीदार पसार आहे. शेवटी मराठी माणसाची आणि राज ठाकरे यांची त्या रिक्शाचालकाने कान पकडून क्षमा मागितली आहे; मात्र मनसैनिक संतापले असून ‘मनसे पद्धती’ने उत्तर देण्यावर ठाम आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !