
तुळजापूर – श्री तुळजाभवानीदेवीचा ‘शाकंभरी नवरात्र महोत्सव’ यंदा २० डिसेंबर ते ४ जानेवारी या काळात होणार आहे. या महोत्सवाच्या सिद्धतेचा आढावा जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या या बैठकीत तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, तसेच प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भक्तांची गर्दी, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यांविषयी सविस्तर चर्चा झाली. मंदिर संस्थानकडून यांविषयी, तसेच भक्तांसाठी वैद्यकीय सुविधा यांची सिद्धता चालू आहे. महोत्सव काळात सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या. महोत्सव काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे.

महोत्सवातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम
२० ते २८ डिसेंबर – देवीची मंचकी निद्रा परंपरेनुसार
२८ डिसेंबर – पहाटे सिंहासन प्रतिष्ठापना, दुपारी घटस्थापना
२९ डिसेंबर – रथ अलंकार महापूजा
३० डिसेंबर – मुरली अलंकार महापूजा
३१ डिसेंबर – जलयात्रा आणि शेषशायी अलंकार महापूजा
१ जानेवारी – भवानी तलवार अलंकार महापूजा
२ जानेवारी – महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा
३ जानेवारी – शाकंभरी पौर्णिमा, नित्योपचार पूजा, दुपारी पूर्णाहुती
४ जानेवारी – भक्तांसाठी महाप्रसाद
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !