
पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – संभाजीनगर (वास्को) येथील श्रीविद्या प्रतिष्ठान या संस्थेकडून आणीबाणीच्या काळात अन्याय, दडपशाही आणि स्वातंत्र्य यांच्यावर झालेल्या आक्रमणाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहिलेल्या सत्याग्रहींच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २० नोव्हेंबर २०२५ या दिवशी दुपारी ४ वाजता पणजी येथील क्राउन(झांट्ये) सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक उपस्थित रहाणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जयंत मोहन मिरिंगकर असतील.
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणी या काळ्याकुट्ट पर्वात आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेल्या सत्याग्रहींचा अद्वितीय त्याग, संघर्ष आणि धैर्य याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गोव्यातील सत्याग्रहींचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी एक विशेष पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून या पुस्तिकेद्वारे आणीबाणीच्या काळातील घटना, आठवणी आणि प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !