
मुंबई – मालवणीनंतर आता दक्षिण मुंबईमध्येही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आढळले आहेत. गिरगाव येथे एका भाजीवाल्या रोहिंग्या घुसखोराने स्थानिक महिलेला सुरी दाखवून धमकावल्याची घटना घडली. यानंतर मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर राज्याचे कौशल्य विकासमंत्री आणि मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन घुसखोरांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Illegal Rohingya Mu$l!m vegetable vendor threatens Hindu woman in Girgaon (Mumbai)!
📌With a sheer rise in the number of infiltrators in the country, they have now started issuing threats. There is no doubt that tomorrow they will carry out deadly attacks and riots. It is… pic.twitter.com/EeeXrSSVC7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2025
गिरगाव येथील घुसखोरांकडे बनावट (खोटी) आधारकार्ड आढळले. या सर्व आधारकार्डांवर एकसमान जन्मदिनांक आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम मुंबई उपनगरातील मालवणी येथील बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली; मात्र अद्यापही मुंबईतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आढळत आहेत. याविषयी मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना गतीने कारवाई करण्याची सूचना केली आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची घुसखोरी आमदार अस्लम शेख यांच्या पाठिंब्याने ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्रीअसे आहे, तर घुसखोरांना पाठिंबा देणार्यांना देशाचे शत्रू म्हणून घोषित करून त्यांच्यावरही कारवाई का होत नाही ? हे जनतेला कळले पाहिजे ! मालवणी येथे पाडण्यात आलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचे बांधकाम पुन्हा उभारण्यासाठी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख त्यांना साहाय्य करत आहेत. प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारीही यासाठी अस्लम शेख यांना साहाय्य करत आहेत. याविषयी पोलिसांनी माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. |
संपादकीय भूमिका
|
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !