|

पोर्ट ब्लेअर – ‘स्वरतरंग संगीत अकादमी, पुणे’ यांनी सेल्युलर कारागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना दिलेली संगीतांजली हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. ज्या स्थळी सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी अमानवीय यातना सहन केल्या, त्या सेल्युलर कारागृहात ८ ते १४ वयोगटातील ३० बालकलाकारांनी ‘बाल मुखातून सावरकर’ हा कार्यक्रम सादर केला. सावरकरांच्या क्रांतीकारी कार्यापासून ते अंदमानच्या काळकोठडीत सोसलेल्या कठोर कारावासापर्यंतच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाच्या संगीतमय गीतरचना, स्वरतरंग संगीत अकादमीच्या संस्थापिका सौ. प्राजक्ता जहागीरदार यांनी संकल्पित आणि दिग्दर्शित केल्या. या वेळी २०० हून अधिक उपस्थितांसमोर देशभक्ती, भावना आणि संगीत यांचा अद्भुत मेळ अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमापूर्वी बालकलाकारांनी पोर्ट ब्लेअर येथील ऐतिहासिक ‘फ्लॅग पॉईंट’ येथे सुभाषचंद्र बोस यांना मानवंदना देत प्रेरणादायी गीते सादर केली. त्यानंतर त्यांनी सावरकर यांच्या काळकोठडीला भेट देऊन त्यागमय इतिहास अनुभवला. कार्यक्रमास अंदमान-निकोबार प्रशासनातील श्रीमती कल्याणी जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‘संगीताच्या संस्कारातून घडणारी पिढी ही देशाची शक्ती आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अंदमानच्या आरोग्य विभागातील अधिकारी अर्चना हर्ष यांनीही मुलांचे कौतुक केले.
या वेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने स्वरतरंग संगीत अकादमीच्या संस्थापिका सौ. प्राजक्ता जहागीरदार यांचाही सत्कार करण्यात आला.

बालमनात देशनिष्ठा दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी !
या उपक्रमामागील उद्देश सावरकरांचे विचार, त्याग, संघर्ष आणि राष्ट्राभिमान मुलांपर्यंत पोचवणे, संस्कृती, भाषा आणि देशनिष्ठा यांचे महत्त्व बालमनात दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
सहभागी मुलांना प्रेरणादायी संदेश !
समारोपाच्या कार्यक्रमात श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांनी सहभागी मुलांना प्रेरणादायी संदेश देत सावरकरांची बिंदु पद्धतीने रेखाटलेली दुर्मिळ प्रतिमा भेट दिली. ‘वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा एक भाग म्हणून सर्व न्यायालयांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत’, असेही त्यांनी नमूद केले.
‘स्वरतरंग संगीत अकादमी’विषयी थोडक्यात !स्वरतरंग संगीत अकादमी ही संस्था अनेक वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, इतिहास आणि आदर्श यांना जपण्यासाठी कार्यरत आहे. बाल गीतरामायण, तिमिरातील तेजोत्सव यांसारख्या संगीतविषयक उपक्रमांनी अकादमीने संस्कृती आणि संगीत शिक्षण यांचा सुंदर संगम साधला आहे. स्वरतरंग संगीत अकादमीने यापूर्वी राममंदिरात ‘गीतरामायण’ सादर करण्याचा मान मिळवला आहे. सेल्युलर कारागृहामधील ही संगीतांजली त्यांच्या सांस्कृतिक प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक टप्पा ठरली. |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन