हत्तरगी पथकर नाक्याजवळ संतप्त आंदोलकांनी दगडफेक केल्याने वाहनांची हानी !

बेळगाव – उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, हावेरी आणि विजापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या आठवड्यापासून ऊस पिकासाठी प्रतिटन ३ सहस्र ५०० रुपये दराच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. बेळगावच्या गुरलापूर येथे चालू झालेले हे आंदोलन हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी पथकर नाक्याजवळ ७ नोव्हेंबरला हिंसक झाले. संतप्त शेतकर्यांच्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी नेते यांची एकत्रित बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
मंत्र्यांच्या चारचाकीवर चपला भिरकावल्या !
दुसर्या एका घटनेत मुदलगी तालुक्यातील गुरलापुरा क्रॉस येथे मंत्री शिवानंद पाटील आंदोलक शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी आले असता संतप्त शेतकर्यांनी मंत्र्यांच्या चारचाकीच्या दिशेने चपला आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली