पतंजलीच्या च्यवनप्राशच्या विज्ञापनात अन्य आस्थापनांच्या उत्पादनाला फसवे म्हटल्याचे प्रकरण
नवी देहली – विज्ञापनांमध्ये इतर आस्थापनांच्या उत्पादनांना ‘फसवे’ सांगणे, चुकीचे आहे; कारण ते अपमानजनक आणि आक्षेपार्ह आहे, असे म्हणत देहली उच्च न्यायालयाने योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि’ आस्थापनाच्या च्यवनप्राशच्या संदर्भातील विज्ञापनाला अंतरिम स्थगिती द्यायची कि नाही ? यावर निर्णय राखून ठेवला. ‘डाबर इंडिया’ आस्थापनाने ‘पतंजलि’विरुद्ध मानहानी आणि अन्याय्य स्पर्धेचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे.
तुम्ही त्यांना हलक्या दर्जाचे म्हणू शकता; पण त्यांना फसवे म्हणू नका !
उच्च न्यायालयाने पतंजलीचे वरिष्ठ अधिवक्ता राजीव नायर यांना प्रश्न विचारला की, ‘फसवे’ याऐवजी ‘कनिष्ठ’ हा शब्द वापरा, त्यात काय अडचण आहे ? तुम्ही म्हणत आहात की, ते सगळे फसवे आहेत आणि मीच खरा आहे. बाकीच्या सगळ्या च्यवनप्राशला तुम्ही कसे फसवे म्हणू शकता ? तुम्ही त्यांना हलक्या दर्जाचे म्हणू शकता; पण त्यांना फसवे म्हणू नका. तुम्हाला शब्दकोशात ‘फसवा’ शब्दाखेरीज दुसरा कोणताही शब्द सापडत नाही का ?
विज्ञापनात काय आहे ?
पतंजलीच्या नवीन ‘पतंजलि स्पेशल च्यवनप्राश’च्या विज्ञापनात रामदेवबाबा ‘च्यवनप्राशच्या नावाखाली बहुतेक लोकांची फसवणूक होत आहे’, असे म्हणतांना दिसत आहेत. या विज्ञापनात पतंजलीचा दावा आहे की, त्यांच्या उत्पादनात आयुर्वेदाच्या ५१ औषधी वनस्पती आणि केशर आहे.

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी