
मुंबई – राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे.
मोर्चाची नोंद घ्यायला भाग पाडा ! – राज ठाकरे
मोर्चाच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे आणि हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खर्या मतदारांसाठी आहे. ‘गल्ली ते दिल्ली’ मोर्चाची नोंद घ्यायला भाग पाडा. मोर्चाचे आयोजन ‘न भूतो न भविष्यती’ असे प्रभावी प्रकारे करावे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकार्यांच्या मेळाव्यात म्हणाले की, राज्यात सध्या होणार्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राच्या सूचीत ९६ लाख खोटे मतदार त्यांपैकी मुंबईत ८ ते १० लाख, ठाण्यामध्ये ८ ते साडेआठ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारे खोटे मतदार भरले आहेत. ‘जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत’, अशी मागणी त्यांनी पूर्वीच केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !