दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा, सत्तरी येथील पोलीस चौकीच्या समोर वाहनाला आग लावल्याचे प्रकरण

पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात स्वयंघोषित कार्यकर्ते सिद्ध झालेले आहेत. हे कार्यकर्ते इतरांचे चारित्र्यहनन करून खंडणी गोळा करत आहेत. सरकार असे करणार्यांवर कारवाई करणार आहेच; पण त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही अशी गैरकृत्ये समाजासमोर आणली पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘राज्यात आज अशासकीय संस्था (‘एन्.जी.ओ.’ – नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स) किंवा स्वयंघोषित कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि अशा संस्था किंवा व्यक्ती कुणाबद्दलही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करतात. अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का ?’, या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. पत्रकारांनी विचारलेला प्रश्न किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले उत्तर हे होंडा, सत्तरी येथील घटनेशी थेट संबंधित नाही, तरीही पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी होंडा, सत्तरी येथे तक्रारदारावर खंडणी गोळा करण्याचा गंभीर आरोप २२ ऑक्टोबर या दिवशी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन