काही बुद्धीप्रामाण्यवादी महिलांकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहितेस आक्षेप !

श्री महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूर, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली आहे. याचे पालन करत प्रवेशद्वारावरील मंदिर समितीचे कर्मचारी, तसेच पोलीस ज्या महिला, युवती बिनबाह्यांचे कपडे (स्लिव्हलेस ब्लाऊज, बाह्या नसलेले फ्रॉक) घालून येतात त्यांना अंग झाकण्याची विनंती करतात. ही विनंती काही बुद्धीवादी आणि स्वत:ला पुढारलेल्या समजणार्‍या महिला धुडकावून लावत श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील वस्त्रसंहितेस आक्षेप घेत आहेत. ‘आमच्या कपडे घालणार्‍यावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण ?’ यांसह अन्य प्रश्न विचारून प्रवेशद्वारावरील मंदिर समितीचे कर्मचारी, तसेच महिला पोलीस यांच्यासमवेत वाद घालत आहेत.

मंदिरात येणार्‍या बहुतांश महिला भाविक मंदिर समितीचे कर्मचारी, तसेच महिला पोलीस यांच्या सूचनांचे पालन करत कृती करतात; मात्र काही महिलांकडून मात्र अकारण वाद उत्पन्न केला जात आहे. ‘आम्ही मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या आहोत, तुम्ही कुठल्या युगात वावरता ?, पुरुषांना वस्त्रसंहिता का नाही ? मंदिर समितीचे कार्यालय कुठे आहे, तुमचे अध्यक्ष कुठे आहेत ?’, यांसह निरर्थक प्रश्न विचारून प्रवेशद्वारावरच गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले, तरी मंदिर समितीचे कर्मचारी, पोलीस त्यांना ठामपणे, प्रेमाच्या भाषेतच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती ! हे पालटण्यासाठी हिदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !
  • हिंदूंना शाळा-महाविद्यालये यांमध्ये धर्माचरणाचे धडे केव्हा देण्यात येणार ?