पर्वती दीपोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

पुणे – सहस्रो पणत्यांच्या प्रकाशात १८ ऑक्टोबरच्या पहाटे ‘पर्वती’ उजळून निघाली. पर्वती परिसरात प्रतिदिन फिरायला येणार्या व्यायामप्रेमी आणि पुणेकरांकडून ‘पर्वती दीपोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. असंख्य दिव्यांनी पर्वती उजळून निघणार्या दीपोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
पर्वतीवरील मुख्य देवदेवेश्वर मंदिर, श्री कार्तिक स्वामी मंदिर, श्रीविष्णु मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पेशवेकालीन संग्रहालय परिसर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे चीर विश्रांतीस्थळ, पुतळा, तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा परिसर तसेच पर्वतीच्या प्रत्येक पायरीवर एकेक पणती लावून संपूर्ण पर्वतीवर प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.
या वर्षीच्या महोत्सवात पर्वती दीपोत्सव समूहासमवेत पर्वती ग्रुप, चाची ग्रुप, माऊली ग्रुप, तळजाई ग्रुप यांनी पुढाकार घेतला. काका पवार तालीम आंतरराष्ट्रीय संकुल जांभुळवाडी, गोकुळ वस्ताद तालीम, हरिश्चंद्र बिराजदार, शिवराम दादा तालीम गणेश पेठ, सह्याद्री संकुल वारजे, मामासाहेब मोहोळ संकुल यांचे विशेष सहकार्य लाभले.
लाल महालामध्येही दीपोत्सव

एकतेची मशाल पेटवूया, द्वेषाचा अंधार दूर करूया. आम्ही सर्व जिजाऊ, शिवरायांचे मावळे आहोत, असा संदेश देत दिवाळीच्या निमित्ताने ‘लाल महाला’मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. लाल महालामध्ये आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी पणत्या लावून लाल महाल असंख्य दिव्यांनी उजळून निघाला. अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाऊंडेशन, अखिल शिवाजीनगर शिवमहोत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या दीपोत्सवाचे १० वे वर्ष आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !