
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत कळंब तालुक्यातील हळदगाव येथे १४० पूरग्रस्त कुटुंबांना ‘शिधा’ वाटप करण्यात आले. यामध्ये डाळ, साखर, रवा, गूळ, गोडेतेल, चहा पावडर, मसाले, साबण, टूथपेस्ट आदी १७ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
हे साहाय्य जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या प्रेरणेने आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थानचे अधिकारी-कर्मचारी यांनी स्वत:चे सामाजिक उत्तरदायित्व ओळखून अतिरिक्त एक दिवसाचे वेतन स्वखर्चाने गोळा करून हे साहाय्य पूरग्रस्तांसाठी अर्पण केले.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !