
मुंबई – ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्य’ या विषयावर आधारित ‘वाद्यमंथन’ या ११० वाद्यांचा परामर्श घेणार्या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. ‘वाद्य कोणत्या प्रकारातील आहे ?, कधी वाजवले जाते ?, याची रचना कशी आहे ?, याचा सांस्कृतिक उपयोग कसा आहे ?’, याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
‘वाद्यमंथन’ या ‘ई-बुक’चा उपयोग विद्यार्थी, अभ्यासक, कलाकार आणि रसिक यांना नक्कीच होईल. या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वाद्यांची जनतेस वेगळी ओळख होईल’, असे प्रतिपादन शेलार यांनी या वेळी केले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील ७५ वाद्यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
पुस्तकात समावेश असलेली काही वाद्ये !
टिमकी, टिंगरी, डेरा, हिरोबाई किंगरी, डकलवार किंगरी, बिगुल, भेर, किल्लेतोंडा, तारपा, पागई, घाटोळी, घांगळी, चोंगा, मंदल, मंदारी, पिरी, ढाक, डहाका, सुरसोटा, गादली, शिंग पेपा, तुरंबा, धुम्मस, डवर, पावरी, दिमडी, गुडगुडी, घुमट, करताल, टप्पा, चिटकुरी, घाटी, खैताळ, रेला, टिंगरी, तिबुली, डोना, घोळकाठी, तटकली, मादळ, गुबूगुबू ढोल, खालुबाजा, कहाळे, तुंबडी, संबळ, सनई, चौघडा, सुंदरी, वेगवेगळ्या प्रकारचे ढोल, भोंगा, पिपाणी, पायपेटी, पखवाज, हलगी ताशा, चोंडके, ढिंगी, सारंगी, तुणतुणे, तुर
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक