
हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवण्यासाठी प्रभा अगोदर येते तसा हा आरंभ आहे ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

शेवटी सत्य हे उघडकीस येणारच आहे आणि त्याचा हा आरंभ आहे. हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवण्यासाठी प्रभा अगोदर येते, तसा हा आरंभ आहे. याचा आपण सर्वांनी आनंद घेऊया आणि गुरुदेवांनी सांगितले त्याप्रमाणे आपण सर्वजण कार्यरत राहूया.
सत्याचा नेहमी विजय होतो ! – स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिति, महाराष्ट्र प्रदेश

आपल्या तीनही हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळाला या गोष्टीचा आनंद आहेच; परंतु त्यासोबतच दुःख याही गोष्टीचे आहे की, डॉ. तावडे यांच्यासारख्यांचा ९ वर्षांचा कालावधी वाया गेला. याची भरपाई आता कोण करेल ? आपल्या हिंदुस्तानमध्ये ही एक यंत्रणा अशी काम करत आहे की, जी सनातन हिंदु धर्माला, साधूसंतांना, हिंदुत्वनिष्ट कार्यकर्त्यांना विरोध आणि दडपण्याचे काम करत आहे. त्यांच्या या धर्मविरोधी अपप्रचाराला हिंदुत्वनिष्ठांना नाहक फसावे लागले आणि त्यांच्या जीवनातील अमूल्य अशी वर्षे वाया जातात; पण सत्याचा नेहमी विजय होतो.
सनातन संस्थेशी जोडलेले लोक कधीच अयोग्य विचार आणि कृती करू शकत नाहीत ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

डॉ. तावडे यांसह तिघांचे जामीन झाले, ही बातमी ऐकल्यानंतर मलाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातील वारकर्यांना अतिशय आनंद झालेला आहे. त्याचे कारण असे की, डॉ. तावडेंसमवेत माझा आणि वारकरी संप्रदायातील अनेकांचा पुष्कळ चांगला संपर्क आणि संबंध आलेला होता. ते अतिशय प्रामाणिक, नि:स्वार्थ आणि हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीमत्त्व आहेत, तसेच राष्ट्राच्या हितासाठी सदैव विचार करणारे आहेत. त्यांच्यावर सनातन संस्थेचे संस्कार असून, ही संस्था संपूर्ण देश आणि हिंदु धर्म यांचा विचार करणारी संस्था आहे, त्यामुळे या संस्थेशी जोडलेले लोक कधीच अयोग्य विचार आणि कृती करू शकत नाहीत. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले आणि त्यामुळेच आज डॉ. तावडेंना जामीन मिळालेला आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा