
अक्कलकोट – येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठे साहाय्य करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे साहाय्य करण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाच्या वतीने ५० लाखांचे ५ सहस्र किलो धान्य शिधा कीट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले, तसेच मंडळाची सहयोगी संस्था हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था (संस्थापक अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले आणि सचिव सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले) यांच्या वतीने १ सहस्र पूरग्रस्त महिलांना साड्या भेट देण्यात आल्या.
या साहाय्याचे १२ ट्रक तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे रवाना करण्यात आले. त्यापूर्वी ट्रकचे पूजन मुख्य पुरोहित अप्पू पुजारी आणि संजय कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चाराने पार पडले.
विजयादशमीच्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी साहाय्यता कार्याची घोषणा केली होती.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान