
सोलापूर – शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि ध्वनीक्षेपक पूर्णपणे काढण्यात आले. शहर आता १०० टक्के भोंगे आणि ध्वनीक्षेपक मुक्त झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम्. राजकुमार यांनी दिली. शहरातील मंदिर, मशीद, चर्च आणि बौद्ध मंदिरे अशा ८९३ धार्मिक स्थळांपैकी २८९ ठिकाणी भोंगे होते. त्यातील २८५ ठिकाणांवरील भोंगे स्वेच्छेने काढण्यात आले, तर उर्वरित ४ भोंगे (२ मंदिरे आणि २ मशिदींवरील भोंगे) बैठकीत निर्णय घेऊन काढण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, कुणावरही पोलिसांना बळजोरी करावी लागली नाही, हे सोलापूरकरांच्या परस्पर समजूतदारपणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या बैठकीस पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, अश्विनी पाटील, तसेच विविध धर्मांचे नेते, ट्रस्टी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !