
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जिवाला पूर्वी धोका होता. त्यांना जिवे मारण्याचा कट आखण्यात आला होता. त्या वेळी पोलिसांनी त्या त्यांचा जीव वाचवला, असे माजी पोलीस अधिकारी आणि चकमकीत मारण्यासाठी प्रसिद्ध असलेलेले प्रदीप शर्मा यांनी ‘एन्.डी.टी.व्ही. मराठी’ या वाहिनीला दिलेल्या या वाहिनीला मुलाखतीत सांगितले.
या वेळी ते म्हणाले की, वर्ष २००३ मध्ये मुलुंडला लोकलगाडीत बाँबस्फोट झाला होता. त्यात ३ पोलिसांना हवे असलेले आतंकवादी होते. ‘मातोश्री’वर आक्रमण करण्याचे त्यांचे नियोजन होते. गोरेगावला महानंदा डेअरीच्या जवळ ते येणार असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही गेलो. त्यांच्याकडे ‘एके ४७‘ आदी सारे होते. मी आणि माझे सहकारी यांच्या ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ला त्याच्या गोळ्या लागल्या होत्या. त्या वेळी ‘फोन टॅपिंग’मध्ये राज ठाकरे यांच्याविषयी चर्चा चालू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना त्यांचा दौरा रहित करण्यास सांगितले. दाऊदची टोळीही त्यांच्या मागावर होती. सध्याचे भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्या घराखाली दाऊदच्या माणसांना पकडले होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !