
जळगाव – हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी समिती, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमी अर्थात् २ ऑक्टोबर या दिवशी नटवर थिएटरच्या समोर, सरस्वती डेअरीजवळ शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शस्त्रपूजन ही सनातन हिंदु धर्माची शौर्यशाली परंपरा आहे. वर्तमान स्थितीत अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रणरागिणीमध्ये चैतन्य निर्माण व्हावे, तसेच शौर्यजागृतीचा संदेश सर्वांपर्यंत पोचावा यासाठी विजयादशमीच्या दिवशी रणरागिणी शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे हे द्वितीय वर्ष असून ‘मैं दुर्गा हूँ । धर्म की ज्वाला हूँ ।’ हे ब्रीदवाक्य आहे.
२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता महिलांच्या हस्ते शस्त्रपूजन केले जाणार आहे. त्यानंतर शौर्य जागृत करणारी प्रात्यक्षिके, रणरागिणी मार्गदर्शन, उत्साहपूर्वक शौर्य गीताचे सादरीकरण येथे होईल. तरी शहरातील शाळा-महाविद्यालयातील मुली, तसेच महिला यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणरागिणीच्या प्रमुख सायली पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांच्याशी ९५५२४२६४३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रणरागिणींचे अभिप्राय
स्त्रीने दुर्गा आणि काली व्हायला हवे ! – सौ. अनुराधा लक्ष्मण वाणी, साहाय्यक सरकारी अधिवक्त्या, जळगाव

स्त्री शक्तीस्वरूपिणी असूनही तिला तिच्या शक्तीचा विसर पडला आहे. तिने ठरवले, तर ती दुर्गा आणि काली बनून अन्यायाविरुद्ध शस्त्र अन् शास्त्र यांद्वारे समाजकंटकांचा नायनाट करू शकते. शक्तीची आठवण करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याला उपस्थित राहून स्वतःया हृदयात अद्वितीय शक्तीचे दीप तेजाळावे.
शौर्य, शिस्त आणि स्वाभिमान यांची परंपरा जपणारा उपक्रम प्रत्येक युवतीसाठी आवश्यक ! – सौ. चित्रा सौरभ चौधरी, भरारी फाऊंडेशन

‘रणरागिणी शस्त्रपूजन’ हा उपक्रम महिलांचा आत्मविश्वास, शारीरिक-मानसिक सामर्थ्य आणि स्वसंरक्षण कौशल्य यांसाठी उपयुक्त ठरतो. भीतीचा सामना करायला शिकल्यामुळे मानसिक सक्षमता निर्माण होते. इतरांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मिसळण्याची कौशल्ये निर्माण होतात. या कार्यक्रमातून धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ? संकटांना सामोरे कसे जावे ? निर्णयक्षमता कशी वाढवावी ? इत्यादी शिकता येते. आत्मविश्वास वाढतो. शौर्य, शिस्त आणि स्वाभिमान यांची परंपरा जपणारा हा उपक्रम प्रत्येक युवतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
शौर्यपरंपरा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी शस्त्रपूजनाचे आयोजन ! – सायली पाटील, हिंदु जनजागृती समिती

शस्त्र म्हणजे केवळ धातू नव्हे, शस्त्र म्हणजे अचल शक्ती, आत्मविश्वास आणि रणशौर्याचा जाज्वल्य दीप ! अनादी काळापासून आपल्या धर्मभूमीत शस्त्रपूजन हे वीरत्व, साहस आणि धर्मरक्षण यांचे पवित्र प्रतीक राहिले आहे. काळाच्या ओघात मंदावलेली ही शौर्यपरंपरा पुन्हा प्रज्वलित करण्याचा संकल्प आम्ही युवती रणरागिणी शस्त्रपूजनातून साकारत आहोत.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !