
सांगली, २४ सप्टेंबर (वार्ता.) – आज घरोघरी जरी देवीचे नवरात्र बसत असले, तरीही या देशाचे अधिष्ठान असलेले ‘देशधर्माचे नवरात्र’ मात्र विस्कटले आहे. हे विस्कटलेले नवरात्र बसवण्यासाठीच श्री शिवप्रतिष्ठानची दुर्गादौड आहे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांना केले.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की,
१. श्री नवदुर्गा अर्थातच चंडी, दुर्गा, भवानी यांचे पूजन आणि भक्ती करणारा, वीरश्री असलेला हिंदु समाज आज आपले वीरत्व अन् क्षात्रतेज हरवून बसला आहे.
२. शेकडो वर्षांची ही गुलामगिरीची मानसिकता नष्ट करण्यासाठी आणि वीरता, धैर्य अन् शक्ती निर्माण करण्यासाठी, तसेच या देशधर्माचे नवरात्र परत एकदा बसवण्यासाठी जागृत होऊया.
३. हिंदवी स्वराज्य, धर्म, राष्ट्र यांची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली आणि शक्ती मागितली, त्याचप्रमाणे आपणही आज याचे समर्पण भावाने, तळमळीने, कळकळीने, उत्कटतेने आईकडे शक्ती मागूया.
४. देश आणि हिंदु समाज यांची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शक्ती, बुद्धी, प्रेरणा अन् बळ मागूया.
५. गणेशोत्सवाचे आज जसे विकृत स्वरूप दिसत आहे, तसेच नवरात्रीचेही होत आहे. अशी विकृती आपल्या सण-उत्सवात येऊ देऊ नका.
६. नवरात्रातील पावित्र्य आणि शौर्य जागवण्यासाठी विकृत अन् बिभत्स पद्धतीने दांडिया खेळणे टाळून या पवित्र उत्सवात वीरश्री जागृत करूया.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !