
पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक किंवा संबंधित व्यावसायिक बेरोजगार रहाणार नाही. आतापर्यंत १२ खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आहे आणि यांपैकी ९ खाणींचे काम त्वरित चालू होणार आहे, तर उर्वरित ३ खाणींचे काम पुढील वर्षी मार्च मासात चालू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने खाणकाम पुन्हा चालू करण्यात यश मिळेल आणि ते ‘खाण अन् खनिजे (विकास आणि नियमन) कायदा’, तसेच सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे यांनुसारच होणार आहे.’’
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा