
मुंबई – स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील अर्ध पुतळ्यावर रंग टाकणारा आरोपी उपेंद्र पावसकर याला शिवडी सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ‘रंग फेकतांना पहाणारे कुणी प्रत्यक्षदर्शी आहेत का ?’, अशी विचारणा न्यायालयाने केली; मात्र प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला. १७ सप्टेंबर या दिवशी सकाळी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अयोग्य पद्धतीने लाल रंग फेकण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादामुळे तणावग्रस्त होऊन पुतळ्यावर रंग फेकला, असा जबाब आरोपीने पोलिसांना दिला.
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !