
महाबळेश्वर, १७ सप्टेंबर (वार्ता.) – महाबळेश्वर येथे वेण्णालेक बोट क्लब कार्यरत आहे. येथील बोटचालकांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे विविध आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वेण्णाई स्थानिक बोटमन आणि कामगार युनियन’ यांसह भाजप कामगार मोर्चाच्या वतीने पालिका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते; मात्र यावर कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे बोटमन कामगारांच्या वतीने महाबळेश्वर पालिका कार्यालयाबाहेर १५ सप्टेंबरपासून कामगारांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. महाबळेश्वर येथील रहिवासी असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथील वेण्णालेक हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. वेण्णालेक येथील व्यवस्थापन महाबळेश्वर नगरपालिकेच्या कह्यात आहे. पालिकेच्या उत्पन्नात महत्त्वाचा वाटा म्हणून ‘वेण्णालेक बोट क्लब’कडे पाहिले जाते. पालिकेच्या आस्थापनात एकूण १३० हून अधिक बोटी असून कायमस्वरूपी बोटचालक म्हणून केवळ ४ कर्मचारीच कार्यरत आहेत. वर्ष २०११ पासून आकृतीबंध अस्तित्वात नाही. तसेच नवीन भरतीही थांबलेली आहे. इतर ५३ जण बोटचालक कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी कपात होत आहे, तसेच त्यांना ओळखपत्रही देण्यात आली आहेत. असे असूनही त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यास अडचणी येत आहेत. या प्रकरणाची सध्या कामगार उपायुक्तांकडे सुनावणी चालू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे !राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील रहिवासी आहेत. बोटचालकांच्या व्यथा त्यांना चांगल्या ठाऊक आहेत. त्यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालून स्थानिक भूमीपुत्र बोटचालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा बोटचालक व्यक्त करत आहेत. |
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !