
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लावूनही ऑगस्ट महिन्यात भारतातील निर्यात वाढली आहे. सरकारकडून ही आकडेवारी घोषित करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारताची व्यापारातील तूट (आयात-निर्यातीतील भेद) अल्प होऊन ती २ लाख ३३ सहस्र कोटी रुपये झाली. जुलै महिन्यात ती २ लाख ४१ सहस्र कोटी रुपये होती. ‘ऑगस्ट महिन्यात २ लाख १८ सहस्र कोटी रुपयांची भारताला व्यापारी तूट होईल’, असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला होता. ऑगस्ट महिन्यात भारतात आयात करत असल्याचे प्रमाण १०.१ टक्क्यांनी अल्प झाले म्हणजेच ते प्रमाण ५ लाख ४२ सहस्र कोटी रुपयांपर्यंत खाली आले, तर निर्यात ६.७ टक्के वाढून ते ३ लाख ९ सहस्र कोटी रुपयांपर्यंत झाले.
अमेरिकेने लावलेल्या शुल्कानंतर भारतावर फार काही परिणाम झाला नाही, असे सांगितले जात आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतातून अमेरिकेत ३ लाख ५६ सहस्र कोटी रुपये अरब डॉलरची निर्यात झाली. भारत हा अमेरिकेचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे; मात्र आता ५० टक्के आयात शुल्कामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. याचा फटका भारतापेक्षा अमेरिकेला अधिक बसतांना दिसत आहे.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण