
सातारा, १२ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर दुसर्याच दिवशी काही गणेशमूर्ती पाण्याबाहेर असल्याचे संगम माहुली ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याविषयी सामाजिक संकेतस्थळावर माहिती मिळताच शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नदीकाठी धाव घेण्यात आली. नदीकाठची स्थिती पाहून विविध हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थ यांच्या साहाय्याने नदीकाठी आलेल्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.
श्री गणेशमूर्ती पाहून शहरातील हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नानासाहेब धर्माधिकारी श्री संप्रदाय, स्वाध्याय परिवार, गुरु अकॅडमी, बालाजी ट्रस्ट यांनी एकत्र येत या गणेशमूर्तींचे पुन्हा विसर्जन केले.
विसर्जन बैठकीची आवश्यकता !
संगम माहुली येथील सरपंच म्हणाले, ‘‘गणेशमूर्ती विसर्जनानंतर ही अडचण प्रतिवर्षी येते; मात्र यावर उपाययोजना होत नाही. प्रतिवर्षी हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ हा उपक्रम राबवतात. जिल्हा प्रशासन ज्याप्रमाणे गणेशोत्सवासाठी शांतता समितीची बैठक घेते, त्याप्रमाणे आपणही विसर्जन नियोजन बैठक घेण्याची आवश्यकता आहे. संगम माहुली हे सातारावासियांचे वैभव आहे. त्याचा उपयोग सर्वांसाठी झाला पाहिजे. गणेशमूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्याची वेळच येऊ नये, यासाठी बोटीची व्यवस्था करू शकतो. तसेच स्थानिक कातकरी समाजबांधवांना साहाय्यासाठी घेऊन श्री गणेशमूर्ती विसर्जन करू शकतो. यामुळे त्यांनाही रोजगाराची संधी मिळेल.’’
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र