
नवी मुंबई : कामोठे येथील शंभो मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात देखाव्यातून उत्तम सामाजिक संदेश देण्यात आला. सध्या समाजात भ्रमणभाषचा वापर पुष्कळ वाढला आहे. नागरिकांना त्याचे दुष्परिणाम लक्षात येत आहे. हा विषय घेऊन ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ हा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होता. त्यातून समाजाच्या ज्वलंत समस्येवर यथोचित संदेश दिला आहे.
View this post on Instagram
सलग दुसर्या वर्षी पारितोषिक !
मंडळाचे हे दुसरे वर्ष असून सलग दुसर्या वर्षीही मंडळाला पारितोषिक मिळाले आहे. यावर्षी ‘जयेंद्र जोशी युवा मंच’ आयोजित ‘सार्वजनिक गणपति मखर सजावट स्पर्धे’त प्रथम क्रमांक मिळवला. आकर्षक मखर सजावट आणि स्वामी समर्थांचे चलचित्र हे येथील विशेष आकर्षण होते, ही माहिती श्रीमती मनिषाताई निळकंठ यांनी दिली.

विविध स्पर्धा आणि वेशभूषा यांचे आयोजन !
या मंडळातर्फे विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाल वर्गासाठी एक दिवसीय सामूहिक श्री गणेशस्तोत्र, तर महिलांसाठी सामूहिक गणपति अथर्वशीर्ष पाठ श्रीमती मनिषाताई निळकंठ, सौ. स्मिताताई गायकवाड यांनी घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीणदादा गवांदे यांनी मंडळात पारंपरिक खेळ आणि महिलांसाठी, तसेच बालकांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात महिलांनी नऊवारी साडी नेसून मंगळागौरीचे मोठ्या उत्साहात सादरीकरण केले. वेशभूषा स्पर्धेत राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश परिधान करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर आणि वारकरी यांच्या वेशभूषेत लहान बालके उपस्थित होती. ज्यांच्यामुळे मुली शिकल्या आणि शिक्षणाची गंगा आली, त्या सवित्रीबाई फुले यांचीही वेशभूषा काहींनी परिधान केली होती. माता सरस्वती आणि माता लक्ष्मी यांची रूपेही वेशभूषेतून दिसून आली.

मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत संस्कृती आणि परंपरा यांतून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. मंडळाचे हे दुसरे वर्ष असूनही सतत दोन्ही वर्षी मंडळाला प्रथम पारितोषिक मिळत आहे, सौ. सोनाली बोर्हाडे, सौ. स्मिता गायकवाड, श्रीमती मनिषाताई निळकंठ, सौ. रूपाली होडगे, श्री. प्रवीण गवांदे, श्री. तेजस जाधव आदी कार्यकर्त्यांचा कार्यकारी मंडळात समावेश होता.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट