
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करणार्या महिला पत्रकारांशी अश्लील वर्तन करणार्या ‘त्रिताल’ ढोल-ताशा पथकातील २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ९ सप्टेंबर या दिवशी संबंधितांना विनयभंग केल्याच्या प्रकरणी फरासखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना बेलबाग चौकामध्ये घडली होती. या प्रकरणी ‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ८ सप्टेंबर या दिवशी निवेदन दिले होते.
तक्रारदार महिला पत्रकार ६ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करत होती. ‘त्रिताल’ पथकातील एका वादकाने लोखंडी गाडी (ट्रॉली) महिला पत्रकाराच्या पायावरून नेली. तेव्हा तिने विचारणा केली असता वादकाने वाद घालून धक्काबुक्की केली. महिला पत्रकारासमवेत असलेल्या सहकार्यास धक्काबुक्की, मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !