इंफाळ/नवी देहली – मणीपूरमध्ये शांतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील कुकी आणि झोमी जमातींच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करणार्या ‘कुकी-झो परिषदे’ ने प्रवासी आणि माल यांच्या मुक्त वाहतुकीसाठी राज्याची जीवनरेखा मानला जाणारा ‘राष्ट्रीय महामार्ग-२’ खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मणीपूरला भेट देणार असल्याची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर ‘कुकी-झो परिषदे’ने केंद्र सरकारसोबत करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका निवेदनात याला दुजोरा दिला आहे.
कुकी बंडखोर गट आणि केंद्र अन् राज्य सरकार यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये मणीपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याच्या आवश्यकतेवर सहमती झाली. या करारात म्हटले आहे की, निर्वासितांच्या छावण्या धोकादायक परिसरापासून दूर हालवण्यात येतील. देहलीत गेल्या काही दिवसांत गृह मंत्रालय आणि ‘कुकी-झो परिषद’ यांच्यात अटी आणि शर्ती यांविषयी चर्चा चालू होती. मणीपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये एन्. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली होती.

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !