
‘४.५.२०२५ या दिवशी पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ७ वर्षे) यांना त्यांची आई (सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर) यांनी ‘गुरु’ होणे आणि ‘अवतार’ होणे यांमध्ये अधिक महत्त्वाचे काय आहे ?’, असे विचारले असतांना त्यांच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

१. पू. वामन यांनी ‘गुरु’ मार्गदर्शन करत असून ‘अवतार’ हे कार्य करतात’, असे सांगणे
सौ. मानसी : ‘गुरु’ होणे आणि ‘अवतार’ होणे यांमध्ये अधिक महत्त्वाचे काय आहे ?
पू. वामन : दोन्ही महत्त्वाचे आहे; कारण ‘गुरु’ आपल्याला शिकवतात आणि ‘अवतार’ हे कार्य करतात.
२. पू. वामन यांनी ‘संपूर्ण ब्रह्मांडात ‘गुरु’ आणि ‘अवतार’ एकत्रित असल्याचे उदाहरण म्हणजे नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !’, असे सांगणे
सौ. मानसी : अरे वा ! किती सुंदर उत्तर दिले आहे ! ‘म्हणजे कसे ?’, ते मला थोडे अधिक स्पष्ट करून सांगणार का?

पू. वामन : हो सांगतो ना. हे बघ, नारायण (पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात.) म्हणतात, त्याप्रमाणे देवाचे ‘अवतार’ हे समष्टी कार्यासाठी जन्म घेतात आणि त्यांचे कार्य करत जातात. ‘गुरु’ हे पृथ्वीवर सर्वांना साधना शिकवायला येतात. गुरूंचे शिष्य, साधक इत्यादी कितीही असू शकतात. ‘गुरु’च सर्वांना मार्गदर्शन करतात. राजालाही त्याचे ‘गुरु’ मार्गदर्शन करत असतात; म्हणून त्याचा राज्यकारभार चांगला चालतो. तसेच ‘गुरु’ आणि ‘अवतार’ हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. आई एक सांगू, ‘गुरु’ आणि ‘अवतार’ एकत्र म्हणजे नारायण ! परात्पर गुरु हे ब्रह्मांडात असे एकटेच असे आहेत, जे ‘गुरु’ आणि ‘अवतार’ असे दोन्ही आहेत. त्यांच्यासारखे दुसरे कुणी नाही आणि पुढेही होणार नाही.
३. पू. वामन यांचे बोलणे ऐकल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. ‘ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता’, असे उत्तर पू. वामन यांनी मला सांगितले.
आ. ही केवळ ईश्वराची इच्छा असल्यामुळेच माझ्या मनात प्रश्न आला. नाहीतर माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या मनात असा प्रश्न येणे शक्य नाही. ही केवळ गुरुकृपा आहे.
इ. ‘अध्यात्मशास्त्र’ हे अनंताचे शास्त्र आहे’, हे परात्पर गुरुदेवांचे विचार सार्थ ठरतात.
ई. प्रत्येक लहान गोष्टीच्या मागे मोठा कार्यकारणभाव असतो.
उ. परात्पर गुरुदेव नेहमी प.पू. भक्तराज महाराज यांचे (गुरूंचे) शिष्यच म्हणून स्वतःला पहातात आणि ते स्वतः अखंड शिष्यभावात राहून शिकण्यातील आनंद अनुभवतात अन् आपल्यालाही नेहमी तेच सांगतात.
ऊ. ‘आपण ‘साधना’, असे म्हणतो; पण आपण खरंच साधना किती करतो ? अध्यात्म कसे जगतो ?’, यांचे चिंतन आणि निरीक्षण करणे अतिशय आवश्यक आहे.
‘परात्पर गुरुदेव, ‘मी कधी विचारही करू शकले नसते’, अशी अध्यात्मातील सूत्रे आपण मला पू. वामन यांच्या माध्यमातून शिकवत आहात. त्यासाठी आपल्या कोमल चरणी पुन्हा एकदा मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा. (५.५.२०२५)
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !