Sudan Landslide: सुदानमध्ये भूस्खलनात १ सहस्र जणांचा मृत्यू

भूस्खलन

खारटूम (सुदान) – पूर्वात्तर आफ्रिकी देश सुदान आधीच गृहयुद्धाच्या विळख्यामुळे होरपळत आहे. अशातच ३१ ऑगस्टला झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे देशातील पश्चिम दारफूर प्रदेशात असलेल्या मारा पर्वतांमधील तारासीन गावात तब्बल १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

येथे अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत असून भूस्खलनात एक संपूर्ण गाव चिखल आणि ढिगारा यांखाली गाडले गेले. ‘सुदान लिबरेशन मूव्हमेंट’ने माहिती दिली की, या नैसर्गिक आपत्तीत गावातील एक व्यक्तीच वाचू शकली आहे. संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय साहाय्य संस्थांना मृतदेह काढण्यासाठी अन् साहाय्यकार्यात साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.