
मिरज (जिल्हा सांगली) – श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी १० ऑगस्ट या दिवशी ब्राह्मणपुरी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी आश्रमाविषयी माहिती दिली. श्री. प्रमोद मुतालिक यांनी आश्रम पाहून आनंद व्यक्त केला, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आश्रमात पूर्वी वास्तव्य केलेल्या खोलीचे भावपूर्ण दर्शन घेऊन त्या खोलीत बसून नामजप केला. श्री. प्रमोद मुतालिक यांना १८ मे या दिवशी गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा