सिंधुदुर्ग – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ ऑगस्ट या दिवशी हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि पोलीस यांना रक्षाबंधन करण्यात आले. या वेळी साधिकांनी औक्षण करून सर्वांना राखी बांधली.

बांदा येथे बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद पावसकर, काजू उद्योजक श्री. नितीन मावळणकर, ‘आशापुरा सिरॅमिक’चे मालक श्री. चंदू पटेल, ‘सुषमा एंटरप्राइझेस’चे श्री. शुभम केसरकर, पत्रकार श्री. आशुतोष भांगले, बांदा तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष श्री. संदेश पावसकर, ‘अकॅडमी ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन’चे मालक श्री. मनोज मालवणकर, बांदा हिंदु एकता मंचाचे कार्यकर्ते तथा माजी सैनिक श्री. नीलेश सावंत, ‘साई माऊली सुपर मार्केट’चे मालक श्री. लक्ष्मण नाईक, ‘महालक्ष्मी एंटरप्राइझेस’चे मालक श्री. जिग्नेश पटेल, ‘स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स्’चे मालक श्री. हेमंत दाभोलकर, ‘कल्पना ट्रेडर्स’चे मालक श्री. सतीश पटेल, व्यापारी श्री. दत्तप्रसाद उपाख्य दादा पावसकर यांना राखी बांधण्यात आली.


सावंतवाडी येथे ‘सुभाष ऑप्टिशियन’चे मालक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक अन् विज्ञापनदाते श्री मनीष राणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते कॅप्टन प्रेमानंद कासकर, श्री आदिनारायण एंटरप्रायझेसचे (फर्निचर शॉपचे) श्री. तेजस सामंत, अधिवक्ता श्री. हळदणकर, कुडाळ येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. विवेक पंडित, श्री स्वानंद कांबळी, सांगिर्डेवाडी येथे श्री. म्हाडेश्वर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमाकांत नाईक, श्री. लक्ष्मण राठोड, श्री. सुंदर मेस्त्री आणि साळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ डॉ. श्रीधर मेस्री यांना राखी बांधण्यात आली, तसेच देवगड पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !