
मुंबई – येत्या १२ ऑगस्टला असलेल्या अंगारक चतुर्थीनिमित्त दर्शनाला येणार्या भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने नियोजन सिद्ध करून ठेवले आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्रींची आरती १२ ऑगस्टला पहाटे ३.१५ ते ३.५० असेल. सायंकाळची धूपारती ७ वाजता होणार असून भाविकांसाठी ११ ऑगस्टच्या सोमवारी मध्यरात्री १.३० ते १२ ऑगस्टच्या पहाटे ३.१५ पर्यंत, तसेच पहाटे ३.५० ते रात्री ९ आणि रात्री ९.३० ते ११.५० पर्यंत श्रींच्या दर्शनाची वेळ आहे. दर्शनार्थींसाठी मोठा मंडप घालण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिरात येतांना सूचनाफलक, मार्गदर्शक फलक वाचावेत. कोणतीही इलेकट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, भ्रमणसंगणक इत्यादी) आणू नये.
भाविकांसाठी विनामूल्य बसव्यवस्था रवींद्र नाट्य मंदिर ते दादर स्थानक अशी करण्यात येईल. दर्शनार्थींना मंडपात ‘प्लाझ्मा स्क्रिन’वर श्रींचे दर्शन घेता येईल. वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, अग्नीशमन सुरक्षेसह भाविकांना चहा-पाणी देण्यात येईल.
दर्शन रांग व्यवस्था सर्वसामान्य भाविकांची रांग ही रवींद्र नाट्य मंदिराशेजारील राजे संभाजी प्रवेशद्वार इथून असून पत्रा गेट क्रमांक ४ पासून गाभारा अशी जाईल तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग असून ही राजे संभाजी प्रवेशद्वारपासून पुढे गेट क्रमांक ६ पासून चालू होईल यासह ज्येष्ठ नागरिक नवजात बालके दिव्यांग किंवा गरोदर स्त्रिया यांच्यासाठी मंदिर प्रवेशद्वार क्र ३ येथून दर्शन रांग चालू होईल. आशीर्वचन पूजा रांग ही सिद्धि प्रवेशद्वार येथून चालू होईल, मुख दर्शनासाठी एस के बोले मार्ग आगर बाजार येथून रांग चालू होईल.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद