प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

अपर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना निवेदन देतांना पुरुषोत्तम हरमलकर आणि समवेत राष्ट्रप्रेमी

सिंधुदुर्ग – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरले जातात. नंतर हे राष्ट्रध्वज इतस्त: पडलेले दिसतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ओरोस येथे अपर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) डॉ. गणपति कमळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना सर्वश्री श्रीकृष्ण शिरोडकर, रमेश राणे, जयदीप सावंत, अशोक हरमलकर, सुभाष चव्हाण, रवींद्र परब आणि पुरुषोत्तम हरमलकर उपस्थित होते.

कुडाळ येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, कुडाळचे नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री अर्जुन गोस्वामी, सतीश सामंत डिंगे, सतीश भांडारकर, सौ.स्नेहलता परब, शिवराम परब, अरविंद मालविया, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष योगेश काळप, चंद्रकांत कदम, आनंद नाईक आदी उपस्थित होते.

सावंतवाडी येथे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांच्यासह सावंतवाडी पोलीस ठाणे आणि पंचम खेमराज महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक रांगणेकर, हिंदु जनजागृती समितीचे उमाजी चव्हाण, शंकर निकम, धमप्रेमी राजेंद्र निगुण, चंद्रकांत बिले, गौरेश सावंत, जीवन केसरकर आदी उपस्थित होते.

मालवण येथे नायब तहसीलदार सौ. प्रिया हर्णे, मालवण पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे यांच्यासह स.का. पाटील महाविद्यालय, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, जयगणेश हायस्कूल या शैक्षणिक संस्थांमध्येही निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता पलाश चव्हाण, हिंदुत्वनिष्ठ सवश्री अशोक ओटवणेकर, रत्नाकर कोळंबकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री महेंद्र पाताडे, प्रणित मांजरेकर, बजरंग दलाचे गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.