मंदिरांसाठी निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, अध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर महासंघ

सुनील घनवट, अध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर महासंघ

अकोला, ४ ऑगस्ट – हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. सरकार मुसलमान आणि ख्रिस्ती संस्थांमध्ये हस्तक्षेप करत नाही; मात्र मंदिरांना वेठीस धरले जाते. ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवादी हिंदु धर्म आणि मंदिर व्यवस्था यांची अपकीर्ती करत आहेत. आता हिंदूंनी संघटित होऊन एक निर्णायक संघर्ष उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे अध्यक्ष श्री. सुनील घनवट यांनी केले.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील मंदिर ट्रस्टींची संयुक्त बैठक श्री व्याळेश्वर महादेव मंदिर, व्याळा येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस १२५ मंदिर विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ते या वेळी म्हणाले की, मंदिर ही केवळ धार्मिक जागा नसून, ते धर्मप्रसाराचे केंद्र आहे. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ म्हणजे मंदिरांना स्वायत्तता मिळणे. योग्य कायदा संमत झाला नाही, तर ही संधी पुन्हा येणार नाही.