भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांची गोवा विधानसभेत मागणी

पणजी, २१ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन करावे, अशी मागणी वास्को मतदारसंघाचे भाजपचे आमदार कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांनी २१ जुलै या दिवशी गोवा विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलतांना केली.
आमदार दाजी साळकर पुढे म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगडाला गोव्यात इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा गड म्हणजे गोव्यातील स्वातंत्र्यसंग्रामाचा एक जिवंत साक्षीदार आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या गडासंबंधी सर्व माहिती आम्हाला आता पुढील पिढीपर्यंत पोचवणे अत्यावश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंध असलेल्या या गडाला न्याय देण्याची आवश्यकता आहे. या गडाची आजची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्याचे संवर्धन करण्याची मागणी करणारे सूत्र मी अधिवेशन काळात अनुदानित मागण्यांवरील चर्चेच्या वेळी, तसेच लक्षवेधी सूचनेद्वारे मांडणार आहे. या विषयावर खासगी ठरावही मांडलेला अहे. फोंडा येथील मर्दनगडाचे संरक्षण करणे पुष्कळ आवश्यक आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई