छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा, तसेच स्वामी समर्थांचा अवमान केल्याचा राग !

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे ‘फत्तेसिंह शिक्षण संस्था’ आणि सकल मराठा समाज यांच्या कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांना काळे फासण्यात आले. येथील ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे कार्यकर्ते आणि शिवभक्त यांनी हे काळे फासल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने ‘शिवधर्म फाऊंडेशन’च्या पदाधिकार्यांच्या मनात राग होता. यासह श्री स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचाही राग पदाधिकार्यांच्या मनात होता. त्यांच्या तोंडाला काळे फासत ‘संभाजी बिग्रेड’ या संघटनेचे नाव पालटण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यापूर्वी ‘शिवधर्म फाऊंडेशन’ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणही केले होते.
इंदापूरमधील ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणार्यांना कह्यात घेतले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !