स्वच्छता आणि महिलांचे आरोग्य यांवर भर !

सौ. रूपाली चाकणकर

पुणे – वारीमध्ये महिला वारकर्‍यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत राज्य महिला आयोगाने ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन’ उपलब्ध करून दिले आहे. या पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता आणि महिलांच्या आरोग्यावर भर दिला आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

वारीमध्ये शौचालयांच्या अभावामुळे अस्वच्छता वाढत होती; मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर फिरती स्वच्छतागृहे, शौचालये उपलब्ध करून दिली आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. महिलांनी टारगटपणा करणार्‍यांचे व्हिडिओ काढून पाठवावेत, त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन’, ‘नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन’, हिरकणी कक्ष आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत, असे चाकणकर यांनी सांगितले.