संगीताची आवड आणि देवाची ओढ असणारा अकोला येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीपाद शैलेंद्र जोशी (वय ९ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीपाद जोशी हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. श्रीपाद शैलेंद्र जोशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. ‘त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव’, यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.६.२०२५) 

‘मी, माझे पती श्री. शैलेंद्र जोशी आणि माझी मुले चि. मयुरेश अन् कु. श्रीपाद, आम्ही सर्व जण पू. नंदूदादा (पू. नंदू कसरेकर, प.पू. भक्तराज महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र) यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो. माझ्या सासूबाई सौ. मेघा जोशी आणि सासरे श्री. वसंत जोशी हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. आमच्या कुटुंबात आम्ही सर्वच जण साधना करत असल्याने आमच्या मुलांवर आध्यात्मिक संस्कार होत आहेत. माझा मुलगा कु. श्रीपाद याची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. श्रीपाद जोशी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीपाद सर्वांशी लवकर जवळीक साधतो. त्याचा चेहरा सतत आनंदी असतो.

२. श्रीपादला मैदानी खेळ खेळायला आवडतात.

सौ. अश्विनी जोशी

३. संगीताची आवड

अ. श्रीपाद तबला छान वाजवतो. पू. पात्रीकरकाका (पू. अशोक पात्रीकर, सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे) घरी आले की, ते त्याला तबला वाजवायला सांगतात. तेव्हा तो तन्मयतेने तबला वाजवतो.

आ. आमचे भजनी मंडळ आहे. त्याला सुटी असेल, तेव्हा तो माझ्या समवेत भजनाला येतो आणि भजनात तल्लीन होऊन टाळ वाजवतो.

इ. एकदा आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथील आश्रमात उत्सवाला गेलो होतो. तेव्हा रात्री उशिरापर्यंत भजन चालू होते. त्या वेळी सगळी मुले झोपली होती; पण श्रीपाद भजन पूर्ण होईपर्यंत टाळ वाजवण्याची सेवा करत होता.

ई. आमच्या घरी तबला, ढोलकी, टाळ आणि संबळ (टीप) आहे. श्रीपाद ही सर्व वाद्ये आवडीने शिकतो आणि वाजवण्याचा प्रयत्न करतो.

टीप – संबळ : एक चर्मवाद्य

४. ऐकण्याची वृत्ती

अ. श्रीपाद आम्ही (आजी-आजोबा आणि आई-वडील यांनी) सांगितलेले सर्व ऐकतो. तो कधीच उलट उत्तर देत नाही.

आ. श्रीपादला पू. नंदूदादा यांनी काहीही सांगितले, तरी तो त्यांचे सर्व ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो. त्यांनी सांगितल्यानुसार श्रीपादने भ्रमणभाष पहाणे बंद केले.

५. त्याच्यात ‘चिकाटी’ हा गुण आहे. त्याला कोणतेही काम सांगितल्यावर तो ते पूर्ण करतोच.

६. देवाची आवड

अ. श्रीपाद देवपूजा आवडीने करतो.

आ. त्याला श्रीराम आणि भगवान शिव यांची भजने ऐकायला फार आवडतात.

इ. त्याला रामरक्षास्तोत्र आणि हनुमानचालिसा ऐकायला अन् म्हणायला आवडते.

ई. त्याने ४ दिवसांत पसायदान आणि मारुतिस्तोत्र पाठ केले. ते तो आवडीने म्हणतो.


संतसेवा करण्यास तत्पर असलेला कु. श्रीपाद शैलेंद्र जोशी (वय ९ वर्षे) !

पू. अशोक पात्रीकर

१. ‘श्रीपाद नेहमी हसतमुख असतो.

२. मी कधी कधी जोशीकाकूंच्या घरी निवासाला असतो. तेव्हा श्रीपाद माझी सेवा करायला तत्पर असतो. तो माझ्या कक्षामध्ये डोकावून पहातो आणि ‘मला काही हवे आहे का ?’, असे विचारतो. मी त्याला तबला वाजवायला सांगितला की, तो माझ्याकडे हसून पहातो आणि तन्मयतेने तबला वाजवतो.

३. मी त्याला खाऊ दिला की, तो आनंदाने घेतो आणि मला नमस्कार करतो.’

– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७५ वर्षे)), अमरावती (३१.५.२०२५)

७. संतां‍वर श्रद्धा असणे

अ. पू. पात्रीकरकाका आमच्या घरी आले की, तो सर्वप्रथम त्यांना साष्टांग नमस्कार करतो.

आ. प.पू. भक्तराज महाराज, पू. नंदूदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर त्याची पुष्कळ श्रद्धा आहे.

८. स्वभावदोष

हट्टीपणा, मोठ्याने बोलणे आणि अव्यवस्थितपणा.’

– सौ. अश्विनी जोशी (श्रीपादची आई), अकोला (३१.५.२०२५)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.