अबुजा (नायजेरिया) – नायजेरियामध्ये १०० हून अधिक जणांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेची माहिती ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरिया’ने दिली. बेन्यू राज्यातील येलवाटा गावात घडलेल्या या घटनेनंतर अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. अनेक कुटुंबांना घरात बंद करून जिवंत जाळण्यात आले. काही मृतदेह इतके जळाले होते की, त्यांची ओळख पटवणेही अशक्य झाले. या घटनेत शेकडो जण घायाळ झाले असून अनेकांना अद्याप वैद्यकीय सुविधा मिळालेल्या नाहीत.


बेन्यू राज्यात प्रामुख्याने मुसलमानबहुल उत्तर आणि ख्रिस्तीबहुल दक्षिण भागांत भूमीच्या वापरावरून सतत हिंसाचार होत असतो. विशेषतः गुरे चारण्यासाठी कुरणांच्या शोधात असलेले गुराखी आणि शेतीसाठी भूमीची आवश्यकता असलेले शेतकरी यांच्यातील संघर्ष येथे नित्याचा आहे. यामुळे वर्ष २०१९ पासून ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला असून अनुमाने २२ लाख लोक विस्थापित झाले आहेत.

धार्मिक स्थळांचे पावित्र्य, कायदेशीर मर्यादा आणि सार्वजनिक शिस्त : एक सर्वसमावेशक विश्लेषण
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !