मुंबई, १४ जून (वार्ता.) – नुकतेच राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचा मद्याचा स्वत:चा ‘ब्रँड’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मद्याची निर्मिती महाराष्ट्रातच करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सद्यःस्थितीत राज्यात भारतीय बनावटीचे विदेशी मद्यनिर्मिती करणारे ७० युनिट्स आहेत. त्यांतील काही युनिट्स बंद आहेत. महाराष्ट्रनिर्मित मद्याच्या निर्मितीसाठी हे युनिट्स चालू करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.
याविषयी उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकार्यांनी सांगितले की, मद्य निर्मिती करणार्या प्रत्येक युनिटमागे एक मद्यालयाचा परवाना दिला जातो. मद्यालयाचा परवाना मिळतो; म्हणून काही युनिट्स चालू आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रनिर्मित मद्यासाठी सरकारकडून शासन निर्णय प्रसारित केला जाईल. त्यानंतर त्याविषयीची पुढील कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाईल.’’
संपादकीय भूमिकामहसूलवाढीसाठी मद्यालयांचा आधार घ्यावा लागणे, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही ! |