|

मुंबई – मुंब्रा येथे एका धोकादायक वळणावर रेल्वे एका बाजूला झुकते, त्या वेळी ६ सहस्र प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. रेल्वेवर प्रचंड भार येऊन ती एका बाजूला झुकते. त्या वळणाविषयी याआधी आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. अन्य वेळी साधारणतः ३ सहस्र ६०० प्रवासी असतात, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे श्री. सिद्धेश देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही दिवा ते ठाणे या दरम्यान रेल्वेगाड्यांची संख्या वाढवा’, असे वारंवार सांगत आहोत. पंतप्रधानांनीसुद्धा ही मागणी मान्य केली; मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाने कृती केली नाही. (याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले पाहिजे आणि पंतप्रधानांनीही यात लक्ष घातले पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक) जे वळण निर्माण झाले आहे, त्यावर अभियंतेही काही करू शकत नाहीत.’’
बैठकीसाठी वेळ न दिल्यास प्रवासी संघटनांची आंदोलनाची चेतावणी !‘प्रवासी संघटनांना गेल्या वर्षभरापासून भेटीची वेळ दिली गेलेली नाही. रेल्वेकडून रेल्वे आणि रेल्वे रूळ यांच्यावर खर्च न करता अमृत योजनेअंतर्गत स्थानकांवर अधिक खर्च केला जात आहे’, असा आरोप प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी बैठकीसाठी वेळ न दिल्यास आंदोलनाची चेतावणी संघटनेने दिली आहे. |
नाशिकला ‘गोमाता संवाद यात्रे’चे स्वागत !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री