|
पणजी, ८ जून (वार्ता.) – आरोग्यंमत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य आरोग्याधिकार्याला कठोर शब्दांत फटकारले होते आणि या वेळी संबंधित आरोग्याधिकार्याने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला: मात्र मंत्र्यांनी त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. यासंबंधीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरला आहे. या घटनेचे डॉक्टरांच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटना, विविध राजकीय पक्ष, तसेच सामाजिक माध्यम यांत तीव्र पडसाद उमटले आहेत.

‘अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महासंघ’ (फेमा) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठवलेल्या एका तातडीच्या पत्रामध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य आरोग्याधिकार्याला जी हीन वागणूक दिली, त्याबद्दल तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला आहे. अशा वागणुकीमुळे आम्हाला धक्काच बसल्याचे संघटनेने म्हटले आहे. मंत्र्यांनी डॉक्टरची सर्वांसमक्ष नाचक्की केली. ही वागणूक अत्यंत मानहानीकारक आहे. आरोप असलेले आरोग्याधिकारी अत्यंत प्रामाणिक सेवा बजावत आहेत.
आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्वरित संबंधित आरोग्याधिकार्याची क्षमा मागितली पाहिजे आणि या प्रकरणी समिती नेमून अन्वेषण केले पाहिजे. यावर ७२ घंट्यांमध्ये तोडगा न निघाल्यास ‘फेमा’ देशभरात गोव्याच्या आरोग्यंमत्र्यांच्या विरोधात आंदोलन आणि निषेध करेल, तसेच काळ्या फिती लावून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यावर विचार करणार आहे. डॉक्टर हे सत्तेचे नव्हे, तर विज्ञान आणि मानवता यांचे सेवक आहेत. या पत्राच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री, भारतीय वैद्यकीय संघटना, मानवी हक्क आयोग आदींना पाठवण्यात आल्या आहेत.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !